मोठी बातमी! वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीला स्थगिती, कोर्टाचे अंतरिम आदेश!
केंद्र सरकारने वक्फ विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रुपांतर झालं. सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले असून, वक्फ कायद्यातील दोन कलमांवर स्थगिती आणली आहे. पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून, फक्त पाच याचिकांवरच सुनावणी होईल.