“मी चर्चा केली अन् भारत-पाक संघर्ष थांबवला”, डोनाल्ड ट्रम्प दाव्यावर ठाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्तीमुळे शस्त्रविराम झाल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही देशातील नेत्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संघर्ष थांबवला. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा उल्लेख करताना सांगितले की, लढणाऱ्या देशांबरोबर व्यापार करणे शक्य नाही. त्यांनी अमेरिकेच्या लष्कर आणि नेत्यांच्या सामर्थ्याचेही कौतुक केले.