सरन्यायाधीश गवईंबाबत जातीवाचक वक्तव्यांप्रकरणी युट्यूबर अजीत भारतीला अटक
युट्यूबर अजीत भारती याला सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भारतीने न्यायालयात बूट फेकण्याच्या प्रयत्नाच्या घटनेवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दुसऱ्या बाजूला. बंगळुरूमध्ये राकेश किशोर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अजीत भारतीविरोधात १२ ते १५ गुन्हे दाखल असून, यात इतर २८ आरोपींचाही समावेश आहे.