प्राचीन बुद्ध रत्न १२७ वर्षांनंतर भारतात परतले; या बुद्धधातूंचे महत्त्व काय?
गौतम बुद्धांचे पिप्राहवा येथील बौद्धधातू तब्बल १२७ वर्षांनंतर भारतात परत आले आहेत. हे बौद्धधातू १८९८ साली उत्तर प्रदेशातील पिप्राहवा येथे सापडले होते, त्यानंतर ते भारताबाहेर नेण्यात आले. १२७ वर्षांनी बुद्ध धातू परत येणं, हा भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी आनंदाचा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र नोदी यांनी गौरवोद्गार काढले. त्याच पार्श्वभूमीवर पिप्राहवा या स्थळाचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे.