इंटरनेट सेवा विस्कळीत! क्लाऊडफ्लेअर आउटेजमागचं खरं कारण काय?
Cloudflare नेटवर्कमध्ये 'widespread 500 errors' निर्माण झाल्याचे X च्या स्टेटस पेजवर त्यांनी स्पष्ट केले. बिघाडामुळे त्यांच्या डॅशबोर्ड, API, वेगळ्या देशात असलेल्या डेटा सेंटर्सवरील नेटवर्कवर परिणाम झाला आहे. क्लाऊडफ्लेअर आपली सेवा पुन्हा व्यवस्थित सुरू करण्यासाठी पडद्यामागे सक्रियपणे काम करत असली, तरी या घटनेने आधुनिक वेबची वस्तुस्थिती आणि काही मोजक्या क्लाऊड सेवा पुरवठादारांवर असलेले अतिअवलंबित्व उघड झाले आहे.