हिंदू मंदिरं राजकीय उलथापालथी आणि तत्त्वज्ञानाच्या बदलांमध्ये कशी टिकून राहिली?
आज आपण ज्याला हिंदू मंदिर म्हणतो, ते पाच हजार वर्षांपेक्षा जुनं नाही. प्राचीन काळात लोक देवतांची पूजा बंदिस्त देवालयांमध्ये किंवा कोरलेल्या मूर्तींसमोर करत नसतं. त्याऐवजी दैवी अनुभव थेट निसर्गातच घेतला जात होता. वृक्ष, प्राणी, नद्या, पर्वत आणि शिळा यांना पवित्र मानलं जात होतं.