लडाखच्या Gen -Z नी भाजपा कार्यालय का जाळलं? राग कशाचा? नेमकं काय घडलं?
बुधवारी लडाखमधील लेह शहरात हिंसाचार उसळला, जेव्हा आंदोलकांनी भाजपच्या कार्यालयाला आणि सीआरपीएफच्या व्हॅनला आग लावली. या हिंसाचारात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लडाखी नागरिक शांततेने उपोषण करून आंदोलन करत होते, मात्र बुधवारी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला.