‘ही’ ८ कारणं सांगतात, पुरुष बाळाला दूध पाजत नसले तरी त्यांनाही का होतो ब्रेस्ट कॅन्सर?
ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त स्त्रियांनाच होतो, असा एक गैरसमज समाजात आहे. परंतु, पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, हे अनेकांना ठाऊकच नसते. हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी असले, तरी जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या पुरुष रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे पुरुषांनाही या रोगाची लक्षण नेमकी काय आहेत, हे माहीत असणं आवश्यक आहे.