तब्बल ११०० कोटींचा सौदा; पंडित नेहरूंच्या बंगल्याला सर्वाधिक किंमत कशासाठी?
भारताच्या इतिहासातील सर्वात महागड्या घराचा सौदा आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील पहिल्या अधिकृत निवासस्थानाची विक्री होत आहे. हे घर तब्बल १,१०० कोटी रुपयांना विकले जाणार असून हे निवासस्थान दिल्लीतील लब्धप्रतिष्ठितांच्या लुटियन्स दिल्लीतील आहे. हा लुटियन्स बंगला झोनमध्ये (LBZ) आहे.