पाकिस्तानच्या हाती लागला ७० अब्ज डॉलर्सचा खजिना; पाकिस्तानचं नशीब बदलणार का?
पाकिस्तान आज अत्यंत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय चलनसाठा आटलेला आहे, घसरत जाणारा रुपया , दुपटीने वाढणारी महागाई आणि कर्जाचा बोजा डोक्यावर अशी परिस्थिती आहे. गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तानला तब्बल २४ वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) मदत घ्यावी लागली. IMF चे पॅकेज मिळाल्यानंतर थोडा श्वास घेणारा पाकिस्तान पुन्हा त्याच कर्जचक्रात अडकला, अशी पुनरावृत्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील रेकॉ डिक सोनं-तांबे खाण प्रकल्प हा इस्लामाबादसाठी भाग्यरेषा ठरू शकतो.