पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेली सुदर्शन चक्र मोहीम नेमकी काय आहे?
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुदर्शन चक्र मोहीमे’ची घोषणा केली. पुढील दहा वर्षांत, म्हणजेच २०३५ पर्यंत, भारताचे सुरक्षा कवच अधिक विस्तारण्याचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करत बळकट करण्याचा रोडमॅपच त्यांनी मांडला. भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रातून प्रेरणा घेत, देश स्वतःची ‘आयर्न डोम’सारखी बहुस्तरीय संरक्षण प्रणाली उभारणार आहे.