सारनाथाच्या स्तूपाचा शोध ब्रिटिशांनी नाही, तर भारतीय राजाने लावला!; काय सांगतात पुरावे?
सारनाथ स्तूपाला २०२५-२६ या वर्षात जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं, याकरिता भारताने नामांकन दिलं आहे. म्हणूनच युनेस्को पथकाच्या प्रस्तावित सारनाथ दौऱ्याआधी भारतीय पुरातत्त्व विभाग या स्थळाची माहिती देणारा नवीन फलक बसवणार आहे. या फलकावर असलेली माहिती दुरूस्त करण्यात आली आहे. यापूर्वी या पवित्र बौद्ध स्थळाचं जतन करण्याचं आणि या स्थळाचं महत्त्व १७९८ साली उघड करण्याचं श्रेय ब्रिटिशांना देण्यात आलं होतं.