वाढत्या वजनामागचे रहस्य उलगडले, अपुरी झोपच; संशोधकांना प्रयोगामध्ये काय नेमकं उलगडलं?
गेल्या काही वर्षांत स्थूलता आणि वाढणारे वजन हा विषय जागतिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंतेचा मुद्दा ठरला आहे. बहुतांश लोक वजन वाढण्याचं कारण फक्त अति खाणं किंवा कमी शारीरिक हालचाल हेच आहे, असे मानतात, पण संशोधन वेगळं चित्र दाखवतं. शरीराचं वजन वाढवणाऱ्या अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित घटक म्हणजे झोप.