शर्वरी वाघने कुटुंबाबरोबर साजरा केला गणेशोत्सव, गावाच्या घराची दाखवली झलक; पाहा
बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ गणेश चतुर्थीनिमित्त तिच्या गावी मोरगावला गेली आहे. तिने सोशल मीडियावर आई आणि बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. शर्वरीने 'बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!' अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. शर्वरी 'मुंज्या', 'महाराज', 'वेदा' चित्रपटांत काम करून प्रसिद्ध झाली असून, लवकरच ती 'अल्फा' आणि इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.