माधुरी दीक्षितच्या पतीने उष्णतेपासून वाचण्यासाठी दिला हा खास सल्ला, डॉ. नेने म्हणाले…
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे हृदय व छातीचे शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक आरोग्याचे समर्थक आहेत. ते त्यांच्या सोशल मीडियावरून लोकांना उपयुक्त माहिती, सल्ले व उपाय सांगत असतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्यांनी भारतातील लोकांना उन्हाळ्यातील असह्य उष्णता सहन करण्यासाठी सोपे उपाय सुचवले.