RCB कडून मृतांच्या नातेवाईकांसाठी १० लाखांची नुकसानभरपाई जाहीर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या रस्त्यावर लाखो चाहते जमले होते. मात्र, एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. आरसीबीने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गर्दी नियोजनाच्या अभावामुळे ही दुर्घटना घडली. स्टेडियमच्या ३५ हजार क्षमतेच्या ठिकाणी अडीच ते तीन लाख लोक जमल्याने गोंधळ उडाला.