भारताच्या नीरज चोप्राने घडवला इतिहास, ‘नर्व्हस नाइन्टी’ चा टप्पा केला पार; पाहा VIDEO
क्रिकेटमध्ये शतकापूर्वीचा नर्व्हस नाईन्टीचा काळ कठीण मानला जातो, तसेच नीरज चोप्रासाठी ९० मीटरचा थ्रो आव्हानात्मक होता. दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने ९०.२३ मीटर भाला फेकत ऐतिहासिक कामगिरी केली. तो ९० मीटरचा टप्पा ओलांडणारा जगातील २५वा भालाफेकपटू ठरला. मात्र, अंतिम प्रयत्नात ज्युलियन वेबरने ९१ मीटर भाला फेकत स्पर्धा जिंकली आणि नीरज दुसऱ्या स्थानी राहिला.