वादळी शतकानंतर ऋषभ पंतची सूचक प्रतिक्रिया; म्हणाला, “आता काही दिवस…”
लखनौ सुपर जाएंट्सने आयपीएलमध्ये ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केलं, पण त्याचा फॉर्म खराब होता. अखेरच्या सामन्यात पंतने ५२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ८ षटकारांसह शतक ठोकलं. लखनौच्या मैदानावर शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सामन्यानंतर पंतने आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आणि इंग्लंड दौऱ्याआधी विश्रांती घेणार असल्याचं सांगितलं.