कर्णधारपद न मिळाल्यामुळे विराट कोहलीचा निवृत्तीचा निर्णय?
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या योजनांमुळे कर्णधारपद न मिळाल्याने त्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. निवृत्तीपूर्वी विराट कोहलीने रवी शास्त्री आणि जय शाह यांच्याशी चर्चा केली होती. बीसीसीआयचे प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांच्याशीही त्याने संपर्क साधला होता, पण निवृत्तीचा निर्णय बदलला नाही.