“ऑस्ट्रेलियाचं ठीक आहे, आमच्याशी बदला का? गांधीजी…”, वासिम जाफरची पोस्ट व्हायरल!
महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. या विजयामुळे देशभरातून टीम इंडियाचे कौतुक होत आहे. माजी सलामीवीर वासिम जाफरने महात्मा गांधींचा उल्लेख करत विनोदी पोस्ट केली, जी चर्चेचा विषय ठरली. भारताने २९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका २४६ धावांत गारद झाली. दीप्ती शर्माने ५ बळी घेतले.