पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच; इंडिया चॅम्पियन्सनं जाहीर केला निर्णय, सेमीफायनलमधून एक्झिट!
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (WCL) मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला आहे. भारतीय संघाने या सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण वातावरणामुळे आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला आहे. WCL ने इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.