रोज सकाळी किती वाजता आंघोळ करावी? चुकीच्या वेळी आंघोळ केली तर होईल ‘असा’ परिणाम
Best Time to Bath: उन्हाळ्यात लोक स्वतःला स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी अनेक वेळा आंघोळ करतात. काही लोकांना उन्हाळ्यात सकाळी लवकर आंघोळ करायला आवडते, तर बरेच लोक उन्हाळ्यापासून आराम मिळवण्यासाठी दुपारी आंघोळ करतात. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आंघोळ करणे खूप महत्वाचे मानले जाते. आयुर्वेदानुसार, योग्य वेळी आंघोळ केल्याने केवळ आरोग्याला फायदा होत नाही तर मानसिक शांती आणि ऊर्जा देखील मिळते. बहुतेक लोकांना आंघोळ करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती याबद्दल माहितंच नसतं?