खोकल्यातून रक्त आलं तर होऊ शकतो ‘हा’ कॅन्सर! सुरूवातीची लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Blood in Cough: खोकल्यात रक्त येणे ही कधीच साधी गोष्ट नसते. खोकल्याबरोबर रक्त दिसल्याने कुणालाही घाबरायला होऊ शकतं. वैद्यकीय भाषेत याला हेमोप्टिसिस म्हणतात. बरेच लोक याकडे साधा खोकला किंवा घशाची खवखव म्हणून दुर्लक्ष करतात, पण हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. टीबी, फुफ्फुसाचा कॅन्सर, ब्रॉन्किएक्टेसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम ही खोकल्यात रक्त येण्याची मोठी कारणे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हे जीवघेणेही ठरू शकते.