मल कडक होत असेल तर दुधात मिसळा फक्त ‘ही’ गोष्ट! पोट आणि आतड्यांमधील सगळी घाण होईल लगेच साफ
How to Clean Stomach: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यात गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता या पोटाच्या समस्या सर्वसाधारण झाल्या आहेत. चुकीचे खाणे, कमी पाणी पिणे, अन्नात फायबरची कमतरता, तेलकट पदार्थ जास्त खाणे, सतत बसून राहणे यामुळे पोट साफ होत नाही आणि मल कडक होतो. अशा वेळी शौचास जाताना जोर लावावा लागतो, त्यामुळे गुदद्वाराला वेदना होतात, कधी रक्तही येते आणि हळूहळू मूळव्याधाची गंभीर समस्या होऊ शकते.