वट पौर्णिमेनिमित्त जोडीदाराला Whatsapp, Insta, Facebook पाठवा खास मराठी शुभेच्छा
हिंदू धर्मात महिलांसाठीचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. देशात विविध राज्यांत वेगवेगळ्या तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. यंदा १० जून २०२५ रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल. याच वटपौर्णिमा सणानिमित्त तुम्ही पतीसह मैत्रिणींना WhatsApp, Instagram आणि Facebook वरून खास शुभेच्छा पाठवू शकता.