Google Doodle on Idli: गुगल डुडलवर ‘इडली’; इडलीतील प्रोबायोटिक्सच्या फायद्याची जगभर दखल!
सकाळच्या नाश्त्याला मऊ, पांढऱ्या, वाफाळलेल्या इडल्यांचा सुगंध आणि बरोबर नारळाची चटणी आणि सांबर अशी कल्पना जरी केली तरी भूक लागतेच! भारतीय खाद्यसंस्कृतीत इडली ही केवळ एक सामान्य डिश नाही, तर ‘आरोग्य आणि चव’ यांचा उत्तम मिलाफ आहे. याच इडलीला गुगलने आपल्या खास डुडलमधून अनोख्या पद्धतीने आज ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सन्मान दिला आहे. पारंपरिक केळीच्या पानावर मांडलेल्या इडलीचे हे डुडल म्हणजे दक्षिण भारताच्या स्वादिष्ट परंपरेला दिलेली डिजिटल सलामीच.