Dry Coconut Benefits सुक्या खोबऱ्याशी मैत्री करा आणि ‘या’ हट्टीविकारांना ठेवा दूर!
सुका मेवा म्हणजे फक्त काजू, बदाम, पिस्ता नाहीत तर गोडांबी, सुकं खोबरं, चारोळी यांचाही समावेश होतो. गोडांबी वीर्यवर्धक असून थंड ऋतूत सेवन करावी. चारोळी लहान मुलांसाठी उत्तम टॉनिक आहे. खोबरे शुक्रवर्धक असून स्त्री-पुरुषांच्या कामेच्छा वाढवते. खोबरे मज्जातंतूंचे पोषण करते आणि नेत्रक्षीणता कमी करते. खोबरे, खारीक, खसखस, खडीसाखर हे नैसर्गिक टॉनिक आहेत.