लघवी केल्यानंतरही लीक होतेय? संसर्ग किडनीपर्यंत जाऊ शकतो, ‘या’ पदार्थामुळे त्रास होईल कमी
Urine Leakage: लघवीशी संबंधित कोणतीही समस्या खूप त्रासदायक ठरू शकते. चुकीचा आहार, पाण्याची कमतरता व बिघडलेला दिनक्रम यांमुळे युरिनरी सिस्टीमवर परिणाम होतो. लघवीच्या समस्यांमध्ये वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, दुखणे किंवा लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब मूत्र पडत राहणे अशा गोष्टी घडतात.