तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! रोजच्या ‘या’ ७ गोष्टी खाल्ल्याने टळू शकतो धोका…
Liver Cancer Symptoms: बराच काळ लिव्हर कॅन्सर हा फक्त वयस्कर लोकांचा आजार मानला जात होता. पण, अलीकडच्या आकडेवारीनुसार एक चिंताजनक गोष्ट दिसतेय. आता तरुणांमध्येही हा आजार वाढत आहे. चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, वाढलेला लठ्ठपणा, जास्त दारूचे सेवन, हिपॅटायटिस संसर्ग आणि चुकीच्या आहारामुळे होणारा “नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर” ही याची मुख्य कारणं आहेत. लिव्हर हा शरीरातील विषारी पदार्थ गाळतो आणि पचनास मदत करतो, पण आता त्याच्यावरचा ताण वाढतो आहे.