Onion Cry Solution: कांदा हा असा एक पदार्थ आहे जो दररोज स्वयंपाकघरात वापरला जातो. तो भाजीची चव वाढवण्यात जेवढा अव्वल आहे तेवढा आपल्याला रडवण्यातदेखील. अशा परिस्थितीत, आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही कितीही कांदा कापला तरी तुमच्या डोळ्यातून एकही अश्रू येणार नाही.
Yellow Teeth Solution: पांढरे आणि सुंदर दात केवळ चेहऱ्याची शोभाच वाढवत नाहीत, तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याची स्थितीही स्पष्ट करतात. आजच्या काळात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. लहान वयातच अनेक मुलांना वाईट सवयी लागतात. आजकालचे तरुण सिगारेट, तंबाखू, हुक्का आणि इतर नशेच्या गोष्टींच्या आहारी जातात आणि त्या गोष्टींचा पहिला परिणाम त्यांच्या दातांवर होतो.
बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी सांगितलं की, आर्थिक क्षमता असूनही ते भाड्याच्या घरात राहतात कारण मृत्यूनंतर कुटुंबात वाद होऊ नयेत. त्यांनी त्यांच्या सावत्र मुलगा सिकंदरविषयीही मतं मांडली, सांगितलं की, पालकांनी मुलांना मोकळीक दिली पाहिजे, म्हणजे ते स्वतःच्या चुका करून शिकतील.
'बिग बॉस मराठी ५' फेम निक्की तांबोळीने ईदच्या दिवशी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला. तिने मांसाहार केल्याचा पश्चात्ताप व्यक्त केला आणि कुर्बानीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या विरोधात मत व्यक्त केले. निक्कीने सांगितले की, प्राण्यांच्या वेदना पाहून तिला वाईट वाटले आणि त्यामुळे तिने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, तिच्या निर्णयामुळे कोणावर टीका करायची नाही, पण स्वतःमध्ये बदल करायचा आहे.
सध्याच्या बदलत्या जागतिक राजकारणात एका बाजूस चीन बरोबर संघर्ष व दुसरीकडे व्यापार आणि दुसऱ्या बाजूस अमेरिकेबाबात व्यापार कराच्या बाबतीत तणाव आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारी अशा दुहेरी पातळ्यांवर तारेवरची कसरत करत भारताची वाटचाल सुरू आहे. चीनबरोबर त्याचं तणावपूर्ण नातं आणि अमेरिकेबरोबर वाढत असलेली व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अशा दोन्ही स्तरावरील आघाड्या भारत सांभाळत आहे. या दोन्ही बाजूंना सांभाळणं भारतासाठी केवळ गरज नसून एक मोठं आव्हानही आहे.
अभिनेता गौरव मोरेने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ट्रोलर्सना थेट शब्दांत सुनावलं. गौरव म्हणतो, ट्रोलर्सनी घाणेरड्या कमेंट्स करण्याऐवजी स्क्रोल करून पुढे जावं. त्याने ट्रोलिंगमुळे होणाऱ्या त्रासाबद्दलही आपली नाराजी व्यक्त केली. गौरव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'मॅडनेस मचायेंगे'नंतर आता 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार आहे.
5 Foods You Should Never Refrigerate : हल्ली प्रत्येकाच्या घरी फ्रिज असतो, ज्यात थंड पाणी आणि बर्फासाठी विविध बाटल्या, ट्रे ठेवतो. त्याशिवाय अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, मसाले, ज्यूसशिवाय काही लोक कडधान्यदेखील फ्रिजमध्ये ठेवतात. अन्नपदार्थ खराब न होता, सुरक्षितरीत्या टिकण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. नेमके कोणते पदार्थ फ्रिजमध्ये साठवून खाल्ल्यास शरीरावर त्याचा विषासारखा परिणाम होतो, ते पदार्थ जाणून घेऊ…
Budh Margi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा युवराज बुध काही काळानंतर राशी बदलत असतो, ज्याचा परिणाम १२ राशींवर कुठे ना कुठे नक्कीच दिसतो. सध्या बुध कर्क राशीत आहे आणि वक्री अवस्थेत आहे. ११ ऑगस्ट रोजी तो याच राशीत मार्गी होईल. बुध ११ ऑगस्टला दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी मार्गी होणार आहे. बुध मार्गी झाल्यावर काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग पाहूया त्या नशिबवान राशी कोणत्या आहेत.
Guru Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषानुसार, इतर ग्रहांप्रमाणेच गुरु ग्रहही वेळोवेळी आपली चाल बदलत असतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, १३ जुलै रोजी गुरुने आर्द्रा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला होता. पण आता ते आता आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत.
देवगुरु २८ जुलैला आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत. ते १२ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहणार आहेत. त्यानंतर १३ ऑगस्टला ते पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गाझामधील दहशतवादी संघटना हमासवर संतापले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात दोन वर्षांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. हमास शस्त्रविरामाबाबत सकारात्मक पावले उचलत नाही. अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावाला हमासने नकार दिल्यामुळे ट्रम्प संतापले आहेत.
'कारगिल विजय दिवस' ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. यंदा २६ जुलै रोजी देश २६ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. हा दिवस भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या शौर्य, पराक्रमाला सलाम करण्याचा दिवस आहे. याच खास प्रसंगी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रपरिवारास देशभक्तीपर शुभेच्छा संदेश पाठवू शकता, तसेच जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण करु शकता. (Kargil Vijay Diwas Wishes)
Love Astrology Boys Get Beautiful Wife: ज्योतिषशास्त्रात काही राशींचा उल्लेख आहे जे लग्नसाथीच्या बाबतीत खूप नशिबवान असतात. आज अशा मुलांबद्दल जाणून घेऊया ज्यांना खूप सुंदर मुली गर्लफ्रेंड आणि लाइफ पार्टनर म्हणून मिळतात.
Mangal Gochar in Kanya Rashi: वैदिक पंचांगानुसार, २८ जुलैच्या रात्री ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला अग्नी तत्वाचा आणि क्रूर ग्रह मानले जाते. त्याला ऊर्जा, धैर्य आणि संघर्षाचे प्रतीक समजले जाते.
भारताच्या संस्कृतीत हत्तींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळापासून हत्ती संपत्ती, सत्ता आणि कामभावनेचे प्रतीक मानले गेले. सिंधू संस्कृतीपासून ते वैदिक आणि बौद्ध परंपरांपर्यंत हत्तींचा उल्लेख आढळतो. हत्तींचा उपयोग लाकूड गोळा करण्यापासून ते युद्धात किल्ले फोडण्यासाठी केला जात असे. मुघल काळातही हत्तींचे महत्त्व कायम राहिले. चीनमध्ये मात्र हत्तींचा नाश करण्यात आला, ज्यामुळे भारत-चीन संस्कृतीतील फरक स्पष्ट होतो.
Lung Cancer Symptoms: कॅन्सर हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. तो लवकर लक्षात येत नाही आणि त्यावर उपचार करणेही सोपे नसते. त्याचप्रमाणे फुफ्फुसाच्या कॅन्सरचेही (Lung Cancer) अनेक प्रकार असतात. पण, जर सुरुवातीच्या टप्प्यातच तो ओळखता आला, तर त्यावर उपचार करता येऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे असते. काही वेळा या लक्षणांचा परिणाम हात आणि पायांवरदेखील दिसू शकतो.
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे मराठी चित्रपटांना फटका बसत आहे. 'येरे येरे पैसा ३' हा चित्रपट सिनेगृहातून काढला जात असल्याने मनसेने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे यांनी मराठी चित्रपटांची गळचेपी केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
Bollywood Actress Skin Secret: उपवास हा आरोग्याविषयीच्या चर्चेत खूप महत्त्वाचा विषय ठरला आहे. काही लोक त्याचा वापर मानसिक समाधानासाठी करतात; तर काही लोक वजन कमी करण्यासाठी उपवासावर अवलंबून राहातात.
शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला वगळायचे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असला तरी, या सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शाहांच्या हाती आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण असून, चार मंत्र्यांना बाहेर काढण्याची चर्चा आहे. भ्रष्टाचार आणि इतर कारणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
अभिनेत्री मोनिका दबाडे, 'ठरलं तर मग'मधील अस्मिता, काही महिन्यांपूर्वी आई बनली. गरोदरपणानंतर मालिकेत पुनरागमन करताना तिला आव्हानांचा सामना करावा लागला. तिने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, कामावर परतताना तिला खूप वाईट वाटलं. मात्र, तिच्या मुलीने समजून घेतलं. मोनिका ९-१० दिवस शूटिंग करते आणि उर्वरित वेळ मुलीसोबत घालवते. निर्मिती संस्थेने तिच्या वेळापत्रकाला मान्यता दिली आहे.
महात्मा गांधींचं तैलरंगातील एक दुर्मीळ व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) ब्रिटिश कलाकार क्लेअर लीटन यांनी १९३१ साली गांधीजींच्या लंडन भेटीदरम्यान म्हणजेच दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी चितारलं होतं. तेच व्यक्तिचित्र आता १.५२ लाख पाऊंड्स (सुमारे १.७५ कोटी रुपये) एवढ्या मोठ्या किंमतीला विकलं गेलं.
जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार हल्क होगन यांचे ७१ व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. १९९० च्या दशकात WWE आणि पॉप कल्चर आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या होगन यांनी हॉलिवूड चित्रपटांतही काम केले होते. WWE ने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे. नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम आणि कुटुंबातील संबंधांवर आधारित ही मालिका आता सात वर्षांचा लिप घेणार आहे. मालिकेने ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. रमा-अक्षय यांच्या जोडीसह मुकादम कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. मालिकेत आता आरोही नावाची नवीन बालकलाकार आरंभी उबाळे दाखल झाली आहे. शशांक केतकरने मालिकेच्या यशाबद्दल आभार मानले आहेत.
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन केंद्र यांची कोनशिला ठेवण्यात आली. फडणवीस यांनी मराठी भाषेचं महत्त्व सांगत, ती संवादाचं माध्यम असल्याचं स्पष्ट केलं. मराठी साहित्य, नाट्यसृष्टीचं महत्त्व अधोरेखित करत, भारतीय भाषांचा अभिमान बाळगण्याचं आवाहन केलं. पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी देशासाठी दिलेलं बलिदानही त्यांनी अधोरेखित केलं.
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी दीप अमावस्येनिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली असून, जांभळ्या साडीत नेसल्याचं पाहायला मिळतं. व्हिडीओमध्ये त्यांनी देवघरात दिव्यांची आणि फुलांची सजावट केली आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असून, पती अविनाश नारकर यांच्यासह व्हिडीओ शेअर करतात. शेवटच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेनंतर त्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसल्या नाहीत.
१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या एआय-१७१ विमानाचा अपघात झाला, ज्यात २६० लोक मृत्यूमुखी पडले. या अपघातानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुट्ट्या घेतल्या. नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी ११२ वैमानिकांनी सुट्टी घेतली होती.
Shravan Shivamuth 2025 : हिंदू धर्म शास्त्रात, चातुर्मासातील श्रावण महिन्यास विशेष महत्व आहे. हा व्रत वैकल्य आणि सणवारांचा महिना असतो. या महिन्यातील सोमवार हा शिवशंकराला समर्पित मानला जातो. यामुळे श्रावणात प्रत्येक सोमवारी शंकराची खास पूजाअर्चा, अभिषेक केला जातो. उत्तर भारतीय पंचांगानुसार, श्रावण महिना सुरु झाला आहे. पण महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांत शुक्रवारी, २५ जुलै २०२५ पासून श्रावण मास सुरु होत आहे. जो २३ ऑगस्ट २०२५ रोजी समाप्त होईल. यंदा चार सोमवार आले आहेत. या श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभो शंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. पण ही शिवामूठ का वाहिली जाते? शिवामूठ वाहण्याचे महत्त्व काय जाणून घेऊ…
Oral Health: आपल्या तोंडाचे आरोग्य हे आरशासारखे असते, ज्यामुळे आपले शरीर किती निरोगी आणि चांगले आहे हे समजते. जर तोंड स्वच्छ नसेल तर केवळ दातांच्या समस्याच नाही तर श्वासोच्छवासाच्या समस्या, हृदयरोग आणि मधुमेह यांसारखे आजार देखील वाढतात. म्हणून, तोंड स्वच्छ ठेवण्यासोबतच, तुम्ही चांगले अन्न देखील खावे.
गौरव मोरे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता, आता 'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्यानंतर गौरवने काही काळ विश्रांती घेतली होती. सिद्धार्थ जाधवसह अनेक सहकाऱ्यांनी त्याला नवीन शोसाठी प्रोत्साहन दिलं. 'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्व २६ जुलैपासून सुरू होणार आहे.
Respiratory Allergy Signs: जसा पावसाळा सुरू होतो, तशी उन्हाच्या तीव्रतेपासून थोडी सुटका मिळते आणि आजूबाजूचं वातावरण ताजंतवानं वाटू लागतं. पावसाळा त्याच्याबरोबर काही अॅलर्जीदेखील घेऊन येतो, जे काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. पावसाळ्यात अॅलर्जी होणं ही एक सामान्य गोष्ट आहे, आणि या काळात अशा लोकांनाही अॅलर्जी होऊ शकते ज्यांना वर्षभर कसलाच त्रास नसतो.
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राजकारणात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या की, पक्षाने सांगितल्यास २०२६ मध्येच परत येऊ शकते. २०१९ मध्ये त्यांनी अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता, पण २०२४ मध्ये त्यांचा पराभव झाला. आता त्या 'क्यूँ की साँस भी कभी बहु थी' मालिकेत परतल्या आहेत. ४९ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
Dizziness standing up Causes: तुम्हालाही कधी-कधी अचानक उभं राहिल्यावर चक्कर येते का? जर ही समस्या वारंवार होत असेल, तर तिला साधी समजून दुर्लक्ष करू नका. हे एक लक्षण गंभीर आजारांची सूचना देऊ शकते. अनेक लोक याला फक्त अशक्तपणा, थकवा किंवा लो बीपी समजतात आणि दुर्लक्ष करतात. पण ही समस्या हृदय, मेंदू किंवा नर्व्ह सिस्टमशी संबंधित आजारांचं सुरुवातीचं लक्षण असू शकते.