सोनचाफ्याला येतील भरपूर कळ्या! कांद्याच्या सालीसोबत द्या ही गोष्ट, १० दिवसात होईल कमाल
Sonchafa Khat Tips: सोनचाफा हे अनेकांच्या आवडीचं फुल आहे. त्याचा सुगंध जेव्हा दरवळतो तेव्हा प्रत्येकजण त्याच्या प्रेमातच पडत. अशा या सोनचाफ्याचं रोप आपल्याही बागेत असावं असं अनेकांना वाटतं. म्हणून जास्वंद गुलाब याबरोबर अनेकजण सोनचाफ्याचं रोप बागेत लावतात. पण फक्त रोप लावून त्याला वेळोवेळी पाणी देऊन सोनचाफ्याच्या कळ्या येत नाहीत. तर या रोपाला वेगवेगळ्या पद्धतीची खते देणे खूप आवश्यक असते, यासाठी बाजारातून महाग सेंद्रिय खत किंवा केमिकल्स आणायची गरज नाही. पण, किचनमधील काही वस्तू वापरूनही काम पूर्ण करता येतं.