टॉयलेटमध्ये कॉफी टाकताच कमाल झाली! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
How to clean Toilet: बर्याच वेळा आपण कॉफी प्यायल्यानंतर उरलेला कॉफीचा चोथा (कॉफी उकळल्यानंतर जी कॉफीची पावडर उरते) निरुपयोगी समजून कचऱ्यात टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हाच कॉफीचा चोथा तुमचा बाथरूम चमकवायला आणि सुगंधी ठेवायला खूप सोपा आणि स्वस्त उपाय ठरू शकतो? होय, स्वयंपाकघरात उरलेली ही साधी गोष्ट जर तुम्ही टॉयलेट साफ करण्यासाठी वापरलात, तर तुमचा बाथरूम काही मिनिटांतच एकदम ताजा आणि स्वच्छ दिसेल.