ओवैसींच्या सभेत मुस्लीम महिलेचं ‘जय शिवराय’चा नारा देत भाषण, “महाराष्ट्रातून एक इंचही…”
एमआयएमने आहिल्यानगर येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रुहिनाझ शेख यांनी भाषणाद्वारे सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांनी सुरुवातीलाच छत्रपती शिवरायांच्या नावाने घोषणा दिली आणि हिंदवी स्वराज्यात मुस्लीमांचं योगदान असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, "आम्ही महाराष्ट्रातून एक इंचही हटणार नाही."