भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणासंदर्भातील शासन आदेशावर नाराजी; “सरकारला हा अधिकार नाही”
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत वातावरण तापलं होतं. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मैदान रिकामं करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारने जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्या, पण यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. छगन भुजबळ यांनी सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.