मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला वेळ वाढवून मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली होती, परंतु आंदोलकांची संख्या वाढली आहे. फडणवीस यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आणि सरकारची सहकार्याची भूमिका स्पष्ट केली.