“…मग मलिष्काचं गाणं का झोंबलं होतं?”, आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न!
कुणाल कामरा प्रकरणी सत्ताधारी आक्रमक झाले असून अंधेरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आदित्य ठाकरेंनी कामराची बाजू घेतली असून त्याने कोणाचंही नाव घेतलं नसताना कारवाई का व्हावी, असा प्रश्न विचारला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.