राज ठाकरेंची साथ सोडत मुळशी पॅटर्नमधला ‘पिट्या भाई’ भाजपात; “संघाचे संस्कार असल्याने…”
राज्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलत आहेत. 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी यांनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला आहे. परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमुळे आणि मराठी चित्रपटांना न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांनी राज ठाकरेंसोबत २२ वर्षे काम केले असून, त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.