“देवेंद्र फडणवीसांना वाटतं की ते मदारी आहेत, पण ठाकरे ब्रँड..”; संजय राऊत काय म्हणाले?
सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सहकार्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने चर्चांना वेग आला. संजय राऊत यांनी फडणवीस यांना मदारी म्हणत टीका केली आणि ठाकरे ब्रँड अजिंक्य असल्याचे सांगितले.