राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनाला, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची चर्चा आहे. ५ जुलैला विजयी मेळाव्यात दोन भाऊ एकत्र आले होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते, ते स्वीकारून उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह शिवतीर्थवर आले. ठाकरे बंधूंच्या या भेटीला आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिले जात आहे.