ठाकरे बंधूंचे मनोमिलन होत असताना मनसेच्या मोठ्या नेत्याचा पक्षाला रामराम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या महाजन यांनी पक्षात जबाबदारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी राज ठाकरेंना मनातून काढू शकत नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत फक्त प्रचारासाठी वापरून घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.