लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लवकरच हप्ता जमा होईल असे आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेत काही चुका झाल्याची कबुली दिली होती. पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी सुरू आहे. त्यामुळे गरजू महिलांनाच लाभ मिळणार आहे.