दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरेंचा विरोध? भूमिका स्पष्ट करत म्हणाले…
शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढलेल्या भेटीमुळे ही चर्चा जोर धरत आहे. मात्र, सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच, त्यांनी वर्धापन दिन पुण्यात करण्याचं कारणही स्पष्ट केलं.