महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे एकनाथ शिंदे दिल्लीत? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले..
गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अधिवेशनाच्या गडबडीत शिंदे दिल्लीला गेल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे शिंदे दिल्लीला गेल्याचा दावा केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे अमित शाह यांना भेटल्याची सूचक पोस्ट शेअर केली आहे.