राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार का? शिवसेना नेत्याचं उत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यात बोलवून उद्धव ठाकरे नवा इतिहास लिहितील का, हा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेत आहे. मागील दोन महिन्यांत ठाकरे बंधूंच्या चार भेटी झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत ते एकत्र येण्याचे संकेत आहेत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय हर्षल प्रधान यांनी दसरा मेळाव्याबाबत सूचक विधान केले आहे, परंतु राज ठाकरे उपस्थित राहतील का, याबाबत स्पष्टता नाही.