बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत बोलताना घेतलं शरद पवारांचं नाव; रामदास कदम म्हणाले, “तेव्हा…
रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाचा दोन दिवस मातोश्रीवर छळ झाल्याचा दावा केला. त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतल्यामुळे खळबळ उडाली. कदम यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आणि त्यांना कपटी म्हटलं. कदम यांनी सांगितलं की, बाळासाहेबांच्या मृतदेहाचे ठसे घेतले गेले होते आणि यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं.