‘रेड सॉइल स्टोरीज’च्या माध्यमातून कोकणाचे दर्शन दाखविणाऱ्या शिरीष गवसचा दुःखद मृत्यू
कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या चॅनेलचा निर्माता शिरीष गवसचा (वय ३३) दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.