“उल्हासनगरमध्ये मेड इन USA…”, शरद पवारांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये पिकला हशा!
गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या फॅशन शोमध्ये Prada कंपनीच्या मॉडेलने कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक केल्याने वाद निर्माण झाला आहे. प्राडाने या चपलांची किंमत एक लाख रुपये ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेटंट घेण्याची गरज व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरी चप्पलची कॉपी केल्याबद्दल प्राडावर टीका केली आहे. शरद पवारांनी उल्हासनगरचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली.