राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या…
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. भाजपात जाण्याच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्या अजूनही ठाकरेंबरोबरच आहेत. स्थानिक पातळीवरील समस्यांमुळे त्यांनी उद्धव ठाकरेंकडे यावं लागलं.