‘भाजपाचं सरकार आल्यापासून पणवती लागली’, दुर्घटनांची यादी वाचत उद्धव ठाकरेंची टीका
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपा आणि शिंदे गटावर टीका केली. त्यांनी म्हटले की, राजकारणात ज्यांना मुलं होत नाहीत, ते दुसऱ्यांची मुलं चोरतात. तसेच, राज ठाकरे आणि आपली युती होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.