राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी, दसरा मेळाव्यात एकत्र दिसणार? उद्धव ठाकरे म्हणाले…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले. दोन्ही कुटुंबांमध्ये मनोमिलन झाले असून, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या घरी भेटी दिल्या. मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घरी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. युतीबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले.